महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अजयच्या 'दे दे प्यार दे'ची रिलीज डेट बदलली, आता 'या' दिवशी होणार प्रदर्शित - tabbu

'दे दे प्यार दे' चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे दोन दिवस बाकी असताना आता प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. हा चित्रपट १७ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.

'दे दे प्यार दे'ची रिलीज डेट बदलली

By

Published : May 15, 2019, 10:15 AM IST

मुंबई- अभिनेता अजय देवगण लवकरच आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. 'दे दे प्यार दे' असं या चित्रपटाचं शीर्षक असून यात त्याच्यासोबत तब्बू आणि रकुल प्रीत या अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. दरम्यान चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे दोन दिवस बाकी असताना आता प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.

हा चित्रपट १७ मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, आता चित्रपट एक दिवस आधीच प्रदर्शित केला जाणार आहे. १६ मे म्हणजेच गुरूवारीच हा सिनेमा चित्रपटगृहे गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून याबद्दलची माहिती दिली आहे.

भूषण कुमार, किशन कुमार आणि लव रंजन यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अजय आशिष नावाच्या ५० वर्षांच्या व्यक्तीचं पात्र साकारत आहे. तर रकुल आयशा नावाचं २६ वर्षाच्या तरूणीचं पात्र साकारत आहे. जी आशिषची गर्लफ्रेंड आहे. तर तब्बू अजयच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details