महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पीएम मोदी बायोपिकला मिळाली नवी रिलीज डेट, आता 'या' दिवशी होणार प्रदर्शित - new release date

निवडणूकांच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास हा आचारसंहितेचा भंग असेल असे सांगत निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली होती. आता या चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे

पीएम मोदी बायोपिकला मिळाली नवी रिलीज डेट

By

Published : May 3, 2019, 10:19 AM IST

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पीएम नरेंद्र मोदी चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉयने मुख्य भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे, मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मार्गात गेल्या अनेक दिवसांपासून अडथळे येत आहेत.


निवडणूकांच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास हा आचारसंहितेचा भंग असेल असे सांगत निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली होती. आता या चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. आता हा चित्रपट निवडणुकांच्या निकालानंतर म्हणजेच मे महिन्यात २४ तारखेला प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबद्दलची माहिती दिली असल्याचे चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी म्हटले आहे. सुरुवातीला हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र, काही कारणांमुळे चित्रपटाचं प्रदर्शन ११ एप्रिलला होणार असल्याचे सांगण्यात आले यानंतर आता मे महिन्यात २४ तारखेला चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मोदींच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details