मुंबई- 'हिरोपंती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या क्रिती सेनॉनने यांनतरही अनेक चित्रपटांत भूमिका साकारल्या. तिच्या नुकतंच प्रदर्शित झालेल्या 'लुका छुपी' चित्रपटालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. यानंतर आता क्रिती लवकरच 'अर्जून पटियाला' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
क्रिती अन् दिलजित दोसांजच्या 'अर्जून पटियाला'ला मिळाली नवी रिलीज डेट - क्रिती सेनॉन
या चित्रपटात ती दिलजित दोसांजसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपटाची नवी रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे
या चित्रपटात ती दिलजित दोसांजसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपटाची नवी रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. येत्या २९ जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिलजित आणि क्रितीशिवाय या चित्रपटात वरूण शर्मा या अभिनेत्याचीही महत्त्वाची भूमिका असणार आहे.
हा एक कॉमेडी चित्रपट असणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित जुगराज हे असून भूषण कुमार, क्रिशन कुमार आणि दिनेश विजन यांचं दिग्दर्शन आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना कॉमेडी चित्रपटात काम करणं काही प्रमाणात अवघड असल्याचं क्रितीनं म्हटलं आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.