मुंबई- अभिनेता अर्जून कपूर लवकरच 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शि झाला, ज्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. अशात आता चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
अर्जून कपूरच्या 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'चं नवं पोस्टर प्रदर्शित - new poster
या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केले आहे. २४ मे २०१९ ला हा चित्रपट चित्रपटगृहात झळकणार आहे.
भारतावर होणाऱ्या हल्ल्यात अनेक निष्पापांचे जाणारे जीव थांबवण्यासाठी ५ लोकांच्या टीमने उचलेलं पाऊल आणि सर्वात क्रुर गुन्हेगार ओसामाला पकडण्यासाठी कोणत्याही हत्यारांविना चाललेली या टीमची धडपड, या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच या पोस्टरवर ५ असे हिरो ज्यांनी लाखोंचं जीवन वाचावलं, असं लिहिण्यात आलं आहे.
दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केले आहे. तर फॉक्स स्टार स्टुडिओज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. २४ मे २०१९ ला हा चित्रपट चित्रपटगृहात झळकणार आहे.