महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अर्जूनने शेअर केलं 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'चं नवं पोस्टर, आज ट्रेलर होणार प्रदर्शित - arjun kapoor

ट्रेलर प्रदर्शनाआधी अर्जूनने या चित्रपटाचं एक नवं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये अर्जूनशिवाय इतरही कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे.

'इंडियाज मोस्ट वॉन्टेड'चं नवं पोस्टर

By

Published : May 2, 2019, 11:45 AM IST

मुंबई- 'इश्कजादे' फेम अभिनेता अर्जून कपूर लवकरच 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अर्जून एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याने प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ट्रेलर प्रदर्शनाआधी अर्जूनने या चित्रपटाचं एक नवं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये अर्जूनशिवाय इतरही कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. राजकुमार गुप्ता यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट अॅक्शन आणि क्राईम थ्रिलर असणार आहे.

२४ मे २०१९ ला हा चित्रपट चित्रपटगृहात झळकणार आहे. भारताला हवा असलेला सर्वात क्रुर गुन्हेगार ज्याचे नाव 'इंडियाज ओसामा' असे आहे, त्याला पकडण्यासाठी अर्जुन आणि टीमची चाललेली धडपड या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आता या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून अर्जूनचे चाहते या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details