मुंबई- 'बधाई हो' आणि 'अंधाधून' चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता आयुष्मान खुराणा लवकरच आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. 'आर्टीकल १५' या चित्रपटात तो एका पोलीस आधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार असून या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.
आयुष्मानच्या 'आर्टीकल १५'चं पहिलं पोस्टर प्रदर्शित, टीझरही आज येणार भेटीस - true story
या फोटोत आयुष्मानचा क्लोज अप लूक पाहायला मिळत आहे. तर त्याने घातलेल्या गॉगलच्या एका काचेत दोन मुलींनी फाशी घेतली आहे तर दुसऱ्या काचेत काही महिला हातात फलक घेऊन मोर्चा काढताना दिसत आहेत
या फोटोत आयुष्मानचा क्लोज अप लूक पाहायला मिळत आहे. तर त्याने घातलेल्या गॉगलच्या एका काचेत दोन मुलींनी फाशी घेतली आहे तर दुसऱ्या काचेत काही महिला हातात फलक घेऊन मोर्चा काढताना दिसत आहेत. एकंदरीतच प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारं हे पोस्टर आहे.
फर्क बहोत कर लिया, अब फर्क लाएंगे, असं या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. एका धक्कादायक सत्य घटनेवर या चित्रपटाची कथा असणार आहे. येत्या २८ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुभव सिन्हा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.