महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'छलांग' चित्रपटाचे नवे पोस्टर झळकले, उद्या ट्रेलर होणार रिलीज - राजकुमार राव, नुसरत भरुचासोबत काम करणार

राजकुमार रावच्या आगामी 'छलांग' चित्रपटाचे नवे पोस्टर झळकले आहे. या चित्रपटात त्याची नुसरत भरुचासोबत जोडी असणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

New poster of 'Chalaang'
'छलांग' चित्रपटाचे नवे पोस्टर

By

Published : Oct 16, 2020, 7:52 PM IST

मुंबई - 'छलांग' या आगामी चित्रपटात अभिनेता राजकुमार राव, नसरत भरुचासोबत काम करणार आहे. या चित्रपटाच्या नव्या पोस्टरची झलक प्रसिद्ध झाली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उद्या, १७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.

अजय देवगण यांची निर्मिती असलेल्या 'छलांग' या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आलंय. यात राजकुमार राव क्रिकेटरची भूमिका साकारणार आहे. त्याच्याभोवती कोंडाळे करुन त्याला पकडण्याची धडपड सर्वजण करताना दिसत आहेत. यात नुसरतही दिसत आहे.

'छलांग' चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता करीत असून टी सिरीजच्या वतीने रिलीज होत आहे. १३ नोव्हेंबर २०२० ला हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर प्रेक्षकांच्या भेटीस येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details