मुंबई - 'बच्चन पांडे' चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि कलाकारांनी मुख्य अभिनेता अक्षय कुमारचा खडबडीत अवतार असलेले नवीन पोस्टर प्रसिध्द केले आहे. क्रिती सॅनॉन, जॅकलीन फर्नांडिस, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, प्रतीक बब्बर आणि अभिमन्यू सिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी लॉन्च होणार आहे.
अक्षय कुमारने त्याच्या व्यक्तिरेखेचा लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "हे एक असे पात्र आहे ज्यामध्ये रंगाच्या दुकानापेक्षा जास्त शेड्स आहेत! 'बच्चन पांडे' आपको डराने, हसाने, रुलाने सब के लिए तैयार है. कृपया त्याला आपले प्रेम द्या. तुमच्या प्रेमाचा ट्रेलर 18 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होत आहे."