मुंबई- बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीनने काही काळातच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱया या अभिनेत्याच्या सिनेमांची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत असतात. अशात नवाजच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
डस्टी टू मीट रस्टी; नवाजच्या आगामी चित्रपटाची घोषणा - bole chudiya
नवाजने आणखी एक नवा चित्रपट साईन केला आहे. डस्टी टू मीट रस्टी असं या चित्रपटाचं शीर्षक आहे.
नवाजने आणखी एक नवा चित्रपट साईन केला आहे. डस्टी टू मीट रस्टी असं या चित्रपटाचं शीर्षक आहे. मोती चोर चकनाचोर आणि बोले चुडियानंतर नवाजचा निर्माता राजेश भाटिया आणि झावेरी किरण यांच्यासोबत हा तिसरा चित्रपट असणार आहे.
काही दिवसांपूर्वीच नवाज फोटोग्राफ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात तो अभिनेत्री सान्या मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर करताना दिसला. मात्र, उत्तम कथा असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार यशस्वी ठरला नाही. आता नवाजच्या आगामी चित्रपटांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.