महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

प्रियंकाने पती निक जोनाससोबत केली महाशिवारात्रीची पूजा - प्रियांका चोप्रा भगवान शंकराची पूजा

सर्व सण उत्साहात साजरे करणाऱ्या प्रियंका चोप्राने महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पूजा व्रत केले. अभिनेत्री प्रियंका तिचा पती निक जोनास सोबत त्यांच्या लॉस एंजेलिस येथील घरी भगवान शिवाची पूजा करत होती.

शिवाची पुजा करताना प्रियंका निक जोनास
शिवाची पुजा करताना प्रियंका निक जोनास

By

Published : Mar 1, 2022, 3:23 PM IST

मुंबई - महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर अभिनेत्री प्रियांका चोप्राने भगवान शंकराची पूजा केली. लॉस एंजेलिसमधील त्यांच्या नवीन घरात पूजा करताना तिचा अमेरिकन पती निक जोनास सोबत होता.

महाशिवरात्रीच्या उत्सवाची एक झलक शेअर करत प्रियांकाने मंगळवारी तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट शेअर केली. अभिनेत्री प्रियंकाने गुलाबी एथनिक पेहराव करताना परिधान केला होता. तर निक पांढऱ्या कुर्ता पायजमामध्ये दिसत आहे. हे जोडपे शिवाच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या मूर्तीसमोर पूजा करताना दिसत आहे.

शिवाची पुजा करताना प्रियंका निक जोनास

प्रियांकानेही सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो शेअर करताना प्रियांकाने लिहिले, "हर हर महादेव! सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा." फोटोमध्ये निक आणि प्रियांका दिसत असताना, त्यांची मुलगी शिवरात्रीच्या सेलिब्रेशनच्या फोटोत दिसत नाही.

प्रियांका आणि निक यांना 22 जानेवारी रोजी सरोगसीच्या माध्यमातून कन्यरत्न प्राप्त झाले आहे. या बहुचर्चित जोडप्याने काही काळ डेटिंग केल्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये लग्न केले होते.

कामाच्या आघाडीवर अभिनेत्री प्रियंका चोप्रा साय-फाय अॅक्शन चित्रपट 'द मॅट्रिक्स रिसरेक्शन्स'मध्ये अखेरची दिसली होती. तिने अलीकडेच 'सिटाडेल' या थ्रिलर मालिकेचे चित्रीकरण पूर्ण केले.

हेही वाचा -Miss Ukraine Warrior : 'मिस युक्रेन' बनली 'रणरागिणी', अनास्तासिया लेनाचा प्रवास

ABOUT THE AUTHOR

...view details