मुंबई- सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'छिछोरे' चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्यात कॉलेजमधील मित्र अनेक वर्षांनतंर पुन्हा एकदा भेटल्यावर काय होतं, याची झलक पाहायला मिळाली. यानंतर आता सिनेमाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
'छिछोरे'चा दोस्ती स्पेशल ट्रेलर प्रदर्शित, कॉलेज जीवनातील धम्माल मस्तीची झलक - वरुण शर्मा
दोस्ती स्पेशल ट्रेलर असं कॅप्शन देत हा नवा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून हॉस्टेलमधील मित्रांमध्ये होणारे विनोदी संवाद आणि धम्माल मस्ती यात पाहायला मिळते. येत्या ६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
दोस्ती स्पेशल ट्रेलर असं कॅप्शन देत हा नवा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून हॉस्टेलमधील मित्रांमध्ये होणारे विनोदी संवाद आणि धम्माल मस्ती यात पाहायला मिळते. या चित्रपटात कॉलेजमधील एका ग्रुपची कॉलेज लाईफ आणि मिड लाईफ दाखवण्यात येणार आहे.
दंगल सिनेमाचे दिग्दर्शक नितेश तिवारी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात श्रद्धा आणि सुशांतशिवाय वरुण शर्मा, ताहिर राज भसीन, नवीन पोलीशेट्टी, तुषार पांजे, सहर्ष कुमार शुक्ला आणि प्रतिक बब्बर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या ६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.