मुंबई- अभिनेत्री-निर्माता प्रियंका चोप्रा लंडनमध्ये तिच्या आगामी ‘टेक्स्ट फॉर यू’ चित्रपटाच्या शुटिंसाठी आली होती. कोविड-१९ चा नवा प्रकार इथे आढळल्यामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे प्रियंका तिचा नवरा निक जोनाससोबत अडकून पडली आहे.
गेल्या पंधरवड्यापासून प्रियंका लंडनमध्ये तिच्या आगामी रोमँटिक टेक्स्ट 'टेक्स फॉर यू विथ हेऊघान' साठी शूट करत होती. प्रियंका आणि चित्रपटाची संपूर्ण टीम आता नजीकच्या काही काळासाठी यूकेमध्ये थांबली आहे. बातमीनुसार चित्रपटाचे शूटिंगही रोखण्यात आले आहे. प्रियंकासाठी हा आव्हानात्मक काळ आहे कारण तिच्यासोबत पती निक जोनास आहे. या चित्रपटात निक जोनासचीही महत्त्वाची भूमिका आहे.
प्रियंका आणि निक हे जोडपे लंडनमध्ये सणासुदीचा काळ एकत्र घालवत आहेत. तिच्या "ख्रिसमस स्पिरीट" ची एक झलक पाहता, प्रियंकाने निक आणि तिचा पाळीव पेट डायनाबरोबर इन्स्टाग्रामवर एक चित्र शेअर केले आहे.