मुंबई - 'झिरो' या चित्रपटाला मिळालेल्या अपयशानंतर आता शाहरुखची जादू इंटरनेटवर पसरलेली दिसत आहे. नुकताच नेटफ्लिक्सच्या 'बार्ड ऑफ बल्ड'चा गुढ टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये इम्रान हाश्मी आणि शाहरुख खान यांच्यातील संभाषण पाहायला मिळत आहे.
'बार्ड ऑफ ब्लड'चा टीझर प्रदर्शित, इम्रान हाश्मी अन् शाहरुखचा उत्कंठावर्धक संवाद - नेटफ्लिक्स सीरिज
या टीझरमध्ये इम्रान हाश्मी आणि शाहरुख खान यांच्यातील संभाषण पाहायला मिळत आहे. त्यांच्यातील हे संभाषण 'बार्ड ऑफ बल्ड'विषयीची उत्कंठा शिगेला पोहोचवणारं आहे. ही थ्रिलर सीरिज बिलाल सिद्दीकी यांच्या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित असणार आहे.
त्यांच्यातील हे संभाषण 'बार्ड ऑफ बल्ड'विषयीची उत्कंठा शिगेला पोहोचवणारं आहे. ही थ्रिलर सीरिज बिलाल सिद्दीकी यांच्या प्रसिद्ध पुस्तकावर आधारित असणार असून शाहरुखच्या रेड चिली एंटरटेंनमेंटतर्फे या सीरिजची निर्मिती केली जाणार आहे. यात इम्रान एका रॉ एजंटच्या भूमिकेत झळकणार आहे.
रिभू दासगुप्ता या सीरिजचं दिग्दर्शन करणार असून आठ भागांची ही सीरिज जगभरात हिंदीसह उर्दू, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या २७ सप्टेंबरला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याची झलक नुकतंच प्रदर्शित करण्यात आलेल्या ४ मिनिटाच्या टीझरमध्ये दिसत आहे.