मुंबई- 'बायपास रोड' या आगामी चित्रपटाचा आकर्षक आणि चित्तथरारक ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नील नितीन मुकेश याची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नीलचा भाऊ नमन मुकेश करीत आहे. नमन मुकेशचा हा दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट आहे.
पाहा, 'बायपास रोड' चित्रपटाचा चित्तथरारक ट्रेलर - Trailer of Bypass Road
'बायपास रोड' या आगामी चित्रपटाचा आकर्षक ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट १ नोव्हेबंरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
'बायपास रोड
'बायपास रोड' या चित्रपटाचा प्रचार 'किलर थ्रिलर' या हॅशटॅगने सुरू झालाय. नील नीतिन मुकेशसोबत अधा शर्मा ही अभिनेत्री काम करीत असून गुल पनंग, शमा सिकंदर, रजीत कपूर, सुधांशू पांडे, मनिष चौधरी आणि ताहेर शब्बीर यांच्या या सिनेमात भूमिका आहेत.
'बायपास रोड' हा चित्रपट १ नोव्हेबंरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे