महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

मिले सुर मेरा तुम्हारा, निल नितीन मुकेशला मिळाली आशाताईंसोबत गाण्याची संधी - आशा भोसले

नील नितीन मुकेशनं आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो, जान-ए-जाँ..ढूँढता फिर रहा, हूँ तुम्हें रात दिन मैं यहाँ से वहाँ...हे गाणं गात असून आशाताई त्याला हे गाणं गाण्यात साथ देताना दिसत आहेत

आशाताईंसोबत निल नितीन मुकेश

By

Published : Sep 4, 2019, 10:42 PM IST

मुंबई- आपल्या मधुर आवाजाने कित्येक श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या आशा भोसले यांच्यासोबत गाणं गाण्याची संधी मिळावी, असं प्रत्येकाचंच स्वप्न असेल. हिच संधी अभिनेता नील नितीन मुकशेला मिळाल्याने त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

हेही वाचा - प्राजक्ता गायकवाडने घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन, बाप्पाला घातलं साकडं

नील नितीन मुकेशनं आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो, जान-ए-जाँ..ढूँढता फिर रहा, हूँ तुम्हें रात दिन मैं यहाँ से वहाँ...हे गाणं गात असून आशाताई त्याला हे गाणं गाण्यात साथ देताना दिसत आहेत. या व्हिडिओला नीलने कॅप्शनही दिलं आहे.

आशाताईंसोबत निल नितीन मुकेश

गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस किती सुंदर गेला. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्यासोबत. आशाताईंच्या आवाजातील माझं सर्वात आवडतं गाणं. या गाण्याच्या काही ओळी त्यांच्यासोबत गाण्याची संधी मिळाली. त्यांच्यासाठी मनात नेहमीच प्रेम आणि आदर राहील, असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा - मुंबईत मुसळधार पाऊस, पल पल दिल के पासचं ट्रेलर लॉन्च इव्हेंट ढकललं पुढे

ABOUT THE AUTHOR

...view details