मुंबई - बॉलिवूडची आघाडीची गायिका नेहा कक्कर आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. तिच्या गाण्यांचे लाखो - करोडो चाहते जगभरात आहेत. मात्र, लाईमलाईटच्या झगमगाटात स्वत:ची ओळख बनवण्यासाठी नेहाने प्रचंड मेहनत घेतली आहे. सुरुवातीच्या काळात स्ट्रगल केल्यानंतर आज तिने बॉलिवूडच्या गायिकांमध्ये आघाडीचे स्थान मिळवले आहे. अलिकडेच तिने ऋषिकेष येथे स्वत:चा बंगला खरेदी केला आहे. याच ठिकाणी तिचा जन्म झाला होता.
ऋषीकेष येथेच नेहाच्या बालपणीच्या आठणी आहेत. एकेकाळी नेहाचे संपूर्ण कुटुंब एका खोलीत राहत असे. ते घरही त्यांचे स्वत:चे नव्हते. त्यासाठी ते भाडे देऊन राहत असत. नेहाने तिच्या जुन्या आणि नवीन घराचा असे दोन्ही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'हा क्षण माझ्यासाठी भावुक आहे', असे लिहून नेहाने तिच्या कुटुंबीयांचे, चाहत्यांचे आभार मानले आहेत.
हेही वाचा -'बागी ३' मधील मुलाची अॅक्शन पाहून टायगरची आई झाली भावूक