महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नेहा कक्करने 'रायझिंग स्टार' फेम रोहनप्रीतशी प्रेमसंबंध असल्याची दिली कबुली - Mystery unveiled by Neha Kakkar

गायिका नेहा कक्कर हिने 'राइजिंग स्टार' फेम रोहनप्रीतशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे. नेहा आणि रोहनप्रीत यांच्या रोका कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. या दोघांचे 24 ऑक्टोबर रोजी लग्न होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Neha Kakkar  with Rohanpreet
नेहा कक्कर, रोहनप्रीत

By

Published : Oct 9, 2020, 8:35 PM IST

मुंबई - बॉलिवूडमधील नामांकित गायिका नेहा कक्कर हिने अखेर एक मोठे रहस्य उघड केले आहे. आज तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'राइजिंग स्टार' फेम रोहनप्रीतशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आहे. नेहाने स्वत: बरोबर रोहनप्रीतचा एक फोटो तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

नेहाने आपल्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''तू माझा आहेस. नीहू प्रीत.''

या फोटोवर प्रतिक्रिया व्यक्त करताना तिचा प्रियकर रोहनप्रीतने लिहिलंय, "बाबू आय लव यू सो मच, मेरा पूत मेरी जान. हो, मी फक्त तुझेच आयुष्य आहे."

रोहनप्रीतने त्याच्या इंस्टाग्रामवर असाच एक फोटो शेअर केला आहे.

त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय , "भेटा, माझे जीवन नेहा कक्कर हिला."

नेहा आणि रोहनप्रीत यांच्या रोका कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. या दोघांचे २४ ऑक्टोबर रोजी लग्न होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तथापि, या बातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details