मुंबई - प्रसिद्ध गायिका नेहा कक्कडच्या आवाजाचे करोडो लोक चाहते आहेत. तिच्या गाण्यांबरोबरच तिच्या डान्सच्या व्हिडिओंमुळे सोशल मीडियावरही प्रचंड चर्चा रंगली आहे. आजकाल नेहा कक्कड इंटरनेटवर भरपूर चर्चेत असते. तिची पंजाबी गाणी सध्या इंटरनेटवर प्रचलित आहेत. काही दिवसांपूर्वीच नेहा कक्कड तिच्या चाहत्यांसाठी आणखी एक पंजाबी गाणे 'खड तैनु में दासा' घेऊन आली आहे. तिचे हे गाणे बरीच हिट ठरले आहे. या गाण्यावर नाचताना तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'खड तैनु में दासा' या पंजाबी गाण्यावर नेहा कक्कर भांगडा करताना दिसली. तिने हा भांगडा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तिने या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. व्हिडिओमध्ये नेहाने पर्पल कलर टॉप आणि ब्लॅक कलरचा प्लाझो घातला आहे.