महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

गुडन्यूज, नेहा धुपिया दुसऱ्यांदा आई होणार; बेबी बंपसह फोटो शेअर

बॉलिवूड आभिनेत्री नेहा धुपिया आणि अभिनेता-मॉडेल अंगद बेदी यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया पुन्हा एकदा गर्भवती आहे. गर्भवती असल्याची माहिती नेहा व अंगदने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

Neha Dhupia
नेहा धुपिया

By

Published : Jul 19, 2021, 12:57 PM IST

मुंबई -अभिनेत्री नेहा धुपियाच्या घरी लवकरच आणखी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. गर्भवती असल्याची माहिती नेहा व अंगदने दिली आहे. नेहा धुपिया दुसऱ्यांदा आई होणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी नेहा घेत आहे.

नेहा धुपियाने दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गुडन्यूज टि्वट करून दिली आहे. आपल्या कुटुंबासोबतचा एक फोटो नेहाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोत नेहाचा बेबी बम्प दिसत आहे. यावेळी नेहासोबत मुलगी मेहर बेदी आणि पती अंगद बेदी असल्याचे दिसते. त्यांचा हा फॅमिली फोटो फारच क्युट दिसत आहे. नेहाने थॅक्यू गॉड, असे कॅप्शन फोटोला दिले आहे. तसेच अंगदनेही तीघांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून 'थॅक्यू बायको' असे म्हटलं आहे.

नेहा धुपियाने 3 वर्षांपूर्वी अभिनेता अंगद बेदीशी 10 मे 2018 रोजी दिल्लीतील एका गुरुद्वारामध्ये लग्न केले होते. तर 18 नोव्हेंबर 2018 रोजी 6 महिन्यांनंतर त्यांची मुलगी मेहरचा जन्म झाला होता. नेहाने 2003 मध्ये तिने 'कयामत' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नेहा एका वेब शोमध्ये पाहायला मिळणार आहे. अखेर काजोलच्या 'हेलिकॉप्टर ईला' सिनेमात दिसली होती.

अभिनेत्री नेहा धुपिया मुलगी मेहर आणि पती अंगद बेदीसह

ABOUT THE AUTHOR

...view details