मुंबई - दिग्गज अभिनेता ऋषी कपूर यांच्या त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची मुलगी रिद्धिमा कपूर साहनी आणि पत्नी नीतू कपूर यांनी त्यांच्या कौटुंबिक अल्बममधील काही अमूल्य फोटोंसह एक ह्रदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे.
"गेले संपूर्ण वर्ष भोवतालच्या जगात दुःख होते कारण आम्ही त्याला गमावले आहे. एकही दिवस असा गेला नाही ज्यादिवशी आम्ही त्याच्याबद्दल बोललो नाही किंवा आठवण केली नाही," असे पोस्टमध्ये लिहिलंय.
"कधीकधी त्याचा शहाणपणाचा सल्ला, त्याचे किस्से !! आम्ही वर्षभर त्याला ओठांवर हास्य देऊन साजरे केले कारण तो कायम आपल्या हृदयात राहील. त्याच्या शिवायचे आयुष्य तसेच असणार नाही याचा आम्ही स्वीकार केलाय.'', असे त्यांनी पुढे लिहिलंय.