महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'आता तरी वय कमी लिहा', नीना गुप्ताची 'गुगल'ला विनंती - नीना गुप्ता यांनी एक नव्या हेअर स्टाईलमधील फोटो

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी एक नव्या हेअर स्टाईलमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. यात तिने गुगलला आता तरी वय कमी करा असे मिश्किल आवाहन केलंय.

Neena Gupta
नीना गुप्ता

By

Published : Jan 29, 2020, 6:03 PM IST


मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता नव्या हेअर स्टाईलमध्ये दिसून आल्या. यानंतर त्यांनी आता तरी माझे वय कमी करा असे आवाहन गुगलला केले आहे. ६० वर्षे वय असलेल्या नीना गुप्ता यांचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

नीना गुप्ता यांनी बुधवारी आपला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. यात त्या नव्या हेअर कटसह दिसत आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी मजेशीर वाक्य लिहिलं आहे. त्यांनी लिहिलंय, गुगलवालों. आता तरी माझे वय कमी लिहा. तांता मोटवाणी हेअर कटसाठी तुम्हाला शुभेच्छा.

'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट २०१७ मध्ये आलेल्या आयुष्यमान खुराणाच्या 'शुभ मंगल सावधान' चित्रपटाचा सीक्वल आहे. यात आयुष्यमान समलैंगिक व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. गजराज राव यांचीही यात भूमिका आहे.

नीना गुप्ता आणि गजराज राव यांनी बधाई हो या चित्रपटात भूमिका केल्या होत्या.

'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा चित्रपट २१ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details