महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

इम्तियाज खत्रीला पुन्हा सोमवारी हजर होण्याचे एनसीबीचे समन्स; तर आणखी एका ड्रग पेडलरला अटक

चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री शनिवारी संध्याकाळी सुमारे 8 तासांच्या चौकशीनंतर NCB कार्यालयातून बाहेर पडले. चौकशीनंतर एनसीबीने पुन्हा एकदा सोमवारी हजर राहण्याचे समन्स खत्री यांना बजावले आहे. दरम्यान, शनिवारी एनसीबीने या प्रकरणी आणखी एका ड्रग पेडलरलाही अटक केली आहे.

इम्तियाज खत्रीला पुन्हा एनसीबीचे समन्स
इम्तियाज खत्रीला पुन्हा एनसीबीचे समन्स

By

Published : Oct 9, 2021, 8:39 PM IST

मुंबई- एनसीबीने शनिवारी सुमारे आठ तास चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांची चौकशी केली. 8 तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने पुन्हा एकदा सोमवारी हजर राहण्याचे समन्स खत्री यांना बजावले आहे. दरम्यान, शनिवारी एनसीबीने या प्रकरणी आणखी एका ड्रग पेडलरलाही अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील एकूण अटक केलेल्यांची संख्या आता 19 वर गेली आहे.

खत्री यांची कसून चौकशी केली

चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री शनिवारी संध्याकाळी सुमारे 8 तासांच्या चौकशीनंतर NCB कार्यालयातून बाहेर पडले. क्रूज ड्रग्स प्रकरणात एनसीबीने त्यांची चौकशी केली. एनसीबीने सुमारे 8 तास खत्रींची कसून चौकशी केली. याआधी एनसीबीने क्रूझ ड्रग्ज प्रकरणी काल चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्या मुंबईतील वांद्रे कार्यालयावर छापा टाकला. अचित कुमारच्या चौकशीत इम्तियाज खत्रीचे नाव पुढे आल्यानंतर एनसीबीने ही कारवाई केली होती.

शाहरुखच्या ड्रायव्हरचीही सुरू आहे चौकशी

आर्यनचा जामिन अर्ज शुक्रवारी न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर आर्यनची पाठवणी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली. दरम्यान, एनसीबीने शनिवारी शाहरुखच्या ड्रायव्हरला चौकशीसाठी समन्स पाठवले. हे समन्स मिळाल्यानंतर शाहरुखचा ड्रायव्हर एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाला. शाहरुख खानचा ड्रायव्हर आर मिश्रा एनसीबी कार्यलयात उपस्थित असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. एनसीबीचे तपास अधिकारी ड्रायव्हरकडून आर्यनच्या दैनंदिन व्यवहाराची माहिती घेण्याची शक्यता आहे.

ठोस पुराव्या अभावी पाच लोकांना सोडले - एनसीबी

क्रुझवर झालेल्या कारवाईनंतर काहींना भाजप नेत्यांच्या फोननंतर एनसीबीने सोडून दिले, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीवर केला होता. नवाब मालिकांचा आरोपानंतर काही तासातच एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे. एनसीबी एक निःपक्ष केंद्रीय संस्था आहे. एनसीबीच्या विरोधात करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे आणि निराधार आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, 2 ऑक्टोबर, 2021 रोजी कार्डीला द क्रुझवर रात्री आम्ही छापा टाकला होता. या कारवाईत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह एकूण 14 जणांना क्रुझवरुन ताब्यात घेतले होते. या सर्व आरोपीना एनसीबी कार्यलयात आणून आम्ही कसून चौकशी केली आणि त्याच्या जबाब नोंदविण्यात आला आहे. चौकशीनंतर ताब्यात असलेल्या 14 पैकी 8 जणांना अटक केली आणि ठोस पुराव्या अभावी पाच लोकांना सोडून देण्यात आल्याची माहिती आज एनसीबीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

हेही वाचा - आर्यन खानला 'कस्टडी'त भेटणारी, 'सुटके'साठी तळमळणारी, कोण आहे ही 'भावूक' होणारी पूजा?

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details