महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नवाजुद्दीनच्या पत्नीने पोटगीसाठी केली 30 कोटींची मागणी! - नवाजुद्दीन सिद्दीकी घटस्फोट प्रकरण

आलियाने यापूर्वीही ट्विट केले होते, की गेल्या 10 वर्षांपासून तिला या नात्याचा सामना करावा लागत आहे आणि सुरुवातीपासूनच त्यांच्यात समस्या होती.

Nawazuddin Siddiqui wife Aalia
नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया

By

Published : May 30, 2020, 4:50 PM IST

मुंबई - नवाजुद्दीन सिद्दीकीला त्याची पत्नी आलिया सिद्दीकीने घटस्फोटासाठी कायदेशीर नोटीस पाठविली आहे, हे सर्वज्ञात आहे. त्यानंतर आलियानेही ट्विटरवर पदार्पण केले जेणेकरून ती आपला मुद्दा स्पष्टपणे मांडू शकेल.

नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार सोशल मीडियावर आलियाने पाठविलेली कायदेशीर नोटीस व्हायरल झाली आहे. त्यात घटस्फोटात देखभाल करण्यासाठी तिने 30 कोटी आणि 4 बीएचके फ्लॅट्स मागितल्याचेही उघड झाले आहे. या अहवालात पुढे असेही म्हटले आहे, की दोन्ही मुलांसाठी २० कोटींच्या एफडीचीही मागणी आहे. पण स्वत: आलियाने ट्विटरवर या सर्व गोष्टी चुकीच्या असल्याचे सांगितले आणि अभिनेता आणि त्याच्या पीआर टीमवर संताप व्यक्त केला.

आलियाने ट्विटमध्ये लिहिले आहे, ''माझ्या वकिलांना बर्‍याच मीडिया हाऊसेसचे कॉल आणि मेसेजेस येत आहेत, ज्यांचा दावा आहे, की त्यांच्याकडे माझ्या घटस्फोटाच्या नोटीसची कॉपी आहे. पडताळणीनंतर आम्हाला कळले, की ही 'खोटी प्रत' आहे. या सर्वांमागे कोण आहे? अर्थात, पीआर टीम एखाद्याचा सन्मान वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. आता बरेच काही बाहेर येईल.''

तिने दुसरे ट्विट केले आणि म्हटले, “मीडिया हाऊसमध्ये बनावट प्रत प्रसारित करणे हे पीआर टीमचे काम आहे, मी सर्व माध्यम संस्था आणि पत्रकारांना विनंती करू इच्छित आहे, की तुम्हाला असे काही आढळल्यास किंवा दिल्यास कृपया कृपया मला संपर्क करा.''

आलियाने यापूर्वीही ट्विट केले होते, की गेल्या 10 वर्षांपासून तिला या नात्याचा सामना करावा लागत आहे आणि सुरुवातीपासूनच त्यांच्यात समस्या होती.

ABOUT THE AUTHOR

...view details