मुंबई - बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच चित्रपट निर्माता उमेश शुक्ला यांच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन सेजल शाह करणार आहेत. पटकथा भावेश मंडलिया यांनी लिहिली आहे.
नव्या चित्रपटाविषयी नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, "मी नेहमीच एक आव्हानात्मक भूमिका शोधत असतो. तशीच या चित्रपटाची कथा आहे. लोकांना नक्कीच यात रुची असेल. या मनोरंजक ग्रपबरोबर काम करताना तुम्ही आमच्याकडून अशी अपेक्षा ठेवू शकता की, असे काही तरी घडणार आहे, ज्याची तुम्ही अपेक्षा ठेवली नव्हती.''