महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

एशियन फिल्म टॅलेंट पुरस्काराने नवाजुद्दीन होणार सन्मानित - Nawazuddin Siddiqui latest news

नवाजुद्दीन सिद्दीकी याला नेटफ्लिक्स एमी-नॉमिनेटेड ओरिजिनल सीरीज 'सेक्रेड गेम्स'साठी सिंगापूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलमध्ये एशियन फिल्म टॅलेंट पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी

By

Published : Nov 7, 2019, 3:59 PM IST


मुंबई - सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याचा एशियन फिल्म टॅलेंट पुरस्काराने सत्कार होणार आहे. २१ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान या फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आलंय.

नवाजुद्दीन सिद्दीकी

या पुरस्कार सोहळ्यासोबतच नवाजुद्दीन फेस्टीव्हलमध्ये प्रेक्षकांशी संवादही साधणार आहे. काही दिवसापूर्वी नवाजला कार्डिफ इंटरनेशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल 'गोल्डन ड्रॅगन अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले होते.

नवाजुद्दीन सिद्दीकी

कामाचा विचार करता नवाजुद्दीन याचा 'मोतीचूर चकनाचूर' हा चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. यात त्याची भूमिका अथिया शेट्टीसोबत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details