महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

VIDEO: नवाजच्या आवाजातील पहिलं रॅप साँग, 'बाहुबली'चा टीझर प्रदर्शित - tamanna bhatiya

बाहुबली असं शीर्षक असलेलं हे गाणं एक रॅप साँग आहे. माझ्या पहिल्या गाण्याचा टीझर शेअर करताना खूप उत्साहित असल्याचं म्हणत नवाजने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा टीझर शेअर केला आहे.

नवाजच्या आवाजातील पहिलं रॅप साँग

By

Published : Jul 15, 2019, 3:21 PM IST

मुंबई- बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने छाप उमटवणारा नवाजुद्दीन सिद्दीकी आता गायन श्रेत्रातही पदार्पण करत आहे. नवाजुद्दीन गाणं गाणार म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच ही गोड बातमी असणार. हे गाणं तो इतर कोणत्या नाही तर स्वतःच्याच 'बोले चुडिया' चित्रपटासाठी गाणार असून या गाण्याचा टीझरही प्रदर्शित झाला आहे.

'बाहुबली' असं शीर्षक असलेलं हे गाणं एक रॅप साँग आहे. माझ्या पहिल्या गाण्याचा टीझर शेअर करताना खूप उत्साहित असल्याचं म्हणत नवाजने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा टीझर शेअर केला आहे. आता नवाजच्या चाहत्यांना अभिनयासोबतच त्याच्या आवाजाचीही जादू अनुभवायला मिळणार आहे. २८ सेकंदाच्या या टीझरमध्ये नवाजशिवाय तमन्ना भाटियाचीही झलक पाहायला मिळत आहे.

'बोले चुडिया' या चित्रपटात सुरूवातीला मौनी रॉयची वर्णी लागली होती. मात्र, काही कारणांमुळे चित्रपटातून तिचा पत्ता कट करण्यात आला. ज्यानंतर याठिकाणी तमन्नाची वर्णी लागली. दरम्यान या चित्रपटाचं दिग्दर्शन नवाजुद्दीनचा भाऊ शम्स नवाज सिद्दीकी करणार असून राजेश आणि किरण भाटिया यांची निर्मिती असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details