मुंबई - आलिया सिद्दीकीने पती नवाजुद्दीनला तलाकची नोटीस पाठवली आहे. सध्या स्पीड पोस्ट सुरू नसल्यामुळे तिने नोटीस ईमेल आणि व्हट्सअॅपवर पाठवली होती. अद्याप तिला नवाजकडून उत्तर मिळालेले नाही. त्यांच्या लग्नाला १० वर्षाहून अधिक काळ झाला असताना हा घटस्फोट का होतोय, याचा खुलासा आलियाने केला आहे.
एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आलिया म्हणाली, ''आम्ही ४-५ वर्षांपासून विभक्त रहात आहोत. नवाज कधीच आपल्यासोबत आणि मुलांसोबत वेळ घालवत नाही. यामुळे मी वैतागले होते. नवाजुद्दीनने माझ्यावर कधीच हात उचलला नाही. परंतु त्याचे ओरडणे आणि विचार करणे सहन करण्यापलीकडचे होते. ''