मुंबई- अभिनेता अभिषेक बच्चन आज त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करीत आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींकडून त्याला हार्दिक शुभेच्छा मिळत असून त्या सर्वांमध्ये सर्वात गोड वाढदिवसाची पोस्ट त्याची भाची नव्या नवेली नंदाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
अलिकडेच आपले इन्स्टाग्राम खाते पब्लिक केलेल्या मव्या नवेलीने अभिषेक मामाला शुभेच्छा दिल्या आहेत. मामासोबतचा एक जुना फोटो शेअर करीत नव्याने 'सर्व गुन्ह्यातील भागीदार' असे म्हणत ज्युनियर बच्चनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांनीसुद्धा सोशल मीडियावर थ्रोबॅक पिक्चर्सच्या कोलाजसह अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बच्चन यांनी लिहिलंय, "मी त्याचे एकदाच नेतृत्व केले होते...त्याचा हात हातात धरुन..तो आता माझे नेतृत्व करतोय माझा हात हातात धरुन."