मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुपरस्टार नवाजुद्दीन सिद्दीकी याला युनाइटेड किंगडमच्या कार्डिफ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन ड्रॅगन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवाजुद्दीनने आपल्या ट्विटरवरुन ही बातमी चाहत्यांना दिली आहे. त्याने युकेच्या वेल्स कॉन्सिलचे जनरल मिक एन्टोनिव्ह यांचे पुरस्कार बहाल केल्याबद्दल याबद्दल आभार मानले आहेत.
नवाजुद्दीन सिद्दीकीचा कार्डिफ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सन्मान - Navajuddin Siddiqui gate Golden Dragan Award in UK festival
सुपरस्टार नवाजुद्दीन सिद्दीकी याला युनाइटेड किंगडमच्या कार्डिफ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये गोल्डन ड्रॅगन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
नवाजने ट्विटमध्ये म्हटलंय, ''युकेच्या वेल्स कॉन्सिलचे जनरल मिक एन्टोनिव्ह यांचे गोल्डन ड्रॅगन पुरस्कार दिल्याबद्दल आभार.'' कार्डिफ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गेल्या गुरुवारी २४ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या काळात आयोजित करण्यात आला होता. यामध्ये हॉलिवूडचे दिग्गज अभिनेता जूडी डेन्च यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला.
नवाजुद्दीन आगामी 'मोतीचूर चकनाचूर' आणि 'बोले चूड़ियां' चित्रपटात झळकणार आहे. 'मोतीचूर चकनाचूर' हा चित्रपट १५ नोव्हेंबरला रिलीज होत आहे.
TAGGED:
ENT