मुंबई- भारतीय सिनेसृष्टील दिग्गज अभिनेता नसिरुद्दीन शाह यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांनी अफगाणीस्तानावर तालिबान यांनी ताबा मिळवल्यानंर त्यांचे कौतुक करणाऱ्या काही भारतीय मुस्लीमांवर टीका करणारा आहे.
नसिरुद्दीने व्हिडिओत म्हटलंय, "तालिबान्यांनी पुन्हा एकदा अफगाणीस्तानवर सत्ता मिळवणे हे जगासाठी काळजीची गोष्ट आहे. यापेक्षाही भारतातील काही मुसलमान घटकांनी त्यांचा विजय साजरा करणे हे काही कमी घातक नाहीत. आज प्रत्येक हिंदुस्थानी मुसलमानांनी प्रश्न विचारला पाहिजे की त्यांना आपल्या धर्मात इस्लाम, रिफॉर्म, आधुनिकता हवी आहे की मागच्या शतकातील मागासलेपणा. मी भारतीय मुसलमान आहे, आणि काही काळापूर्वी मिर्झा गालिब यांनी म्हटलं होतं की, ''मेरा रिश्ता अल्ला मियां से बेहद बेतकल्लुफ है, मुझे सियासी मजहब की कोई जरुरत नहीं.''