महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नाना पाटेकर यांना क्लीन चीट मिळाल्याच्या बातम्या केवळ अफवा, तनुश्री दत्तचा खुलासा - police

नाना पाटेकर यांना क्लीन चीट दिली असल्याच्ये वृत्त सध्या माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र, या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून नाना पाटेकरांना क्लीन चीट मिळाल्याची अफवा सध्या पसरवली जात असल्याचे तनुश्रीने म्हटले आहे.

नाना पाटकेरांना क्लीन चीट नाही

By

Published : May 17, 2019, 12:23 PM IST

Updated : May 18, 2019, 10:24 AM IST

मुंबई- नाना-तनुश्री वादाला नवं वळण मिळालं असून या प्रकरणात कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळाला नसल्याने पोलिसांनी नानांना क्लीन चीट दिली असल्याच्ये वृत्त सध्या माध्यमांमध्ये पाहायला मिळत आहे. अशात आता तनुश्रीने हे वृत्त फोटाळून लावत, या केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.

या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून नाना पाटेकरांना क्लीन चीट मिळाल्याची अफवा सध्या पसरवली जात असल्याचे तिने म्हटले आहे. सध्या मीडियामध्ये चुकीचे वृत्त प्रसारित होत आहे, की नाना पाटेकरांना क्लीन चीट मिळाली आहे. त्यामुळे, यासंदर्भात मी स्पष्टीकरण देत असल्याचे म्हणत, मुंबई पोलिसांनी असं कोणतंही स्टेटमेंट दिलेल नाही. यासंबंधात अजून चौकशी सुरू असल्याचं तनुश्रीनं सांगितलं आहे.

हे प्रकरण भरकटवण्यासाठी नानांच्या टीमकडून चुकीचे साक्षीदार उभे केले जात आहेत. अनेकजण भीतीपोटी नानांच्या विरोधात बोलायला तयार नसल्याचे तिने म्हटले आहे. या प्रकरणात आपल्याला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण लढत राहणार असून त्यासाठी कितीही वेळ लागला तरी हार मानणार नसल्याचंही तनुश्रीनं स्पष्ट केलं आहे.

Last Updated : May 18, 2019, 10:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details