महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नम्रता शिरोडकरने शेअर केला शेवटच्या सिनेमाच्या शेवटच्या दिवसाचा फोटो - नम्रता शिरोडकर आठवणींच्या जगातून प्रवास

नम्रता शिरोडकर आठवणींच्या जगातून प्रवास करीत आहे. तिला तिच्या शेवटच्या 'ब्राइड अ‌ॅण्ड प्रेज्युडिस' या चित्रपटाची आठवण झालीय. इन्स्टाग्रामवर तिने चित्रपटाच्या सेटवरील क्रूसोबतचा एक फोटो शेअर केलाय.

Namrata Shirodkar
नम्रता शिरोडकर

By

Published : Jul 10, 2020, 1:31 PM IST

हैदराबाद - तेलगू सुपरस्टार महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकर हिने तिच्या “शेवटच्या चित्रपटाच्या” शेवटच्या दिवसाचे एक चित्र इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. "हा खास आहे !! माझ्या शेवटच्या चित्रपटाच्या सेटवर माझा शेवटचा दिवस, 'ब्राइड अँड प्रेज्युडिस' !!" असे तिने फोटोसोबत लिहिले आहे.

"हा आमच्या चित्रपटाचा शेवट होता आणि माझ्या कारकिर्दीचाही शेवट!! या विशाल क्रू आणि कास्टसोबत ३ महिने घालवल्यानंतर घरी परतून लग्न करायचे होते....प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला.!! यासोबत असंख्य आठवणी जोडल्या गेल्या आहेत. संतोष सिवन माझ्यासोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद. #कृतज्ञता #आनंद #thosewerethedays @aishwaryaraibachchan_arb @gurinder.chadha @anupampkher @indypindy9 #throwbackthursday," असे नम्रताने लिहिलंय.

२००४मध्ये रिलीज झालेल्या ब्राइड अँड प्रेज्युडीस चित्रपटाचे दिग्दर्शन गुरिंदर चड्ढा यांनी केले होते. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन, मार्टिन हेंडरसन, नवीन अँड्र्यूज, सोनाली कुलकर्णी, नादिरा बब्बर आणि अनुपम खेर मुख्य भूमिकेत होते.

हेही वाचा - भेदभाव करणाऱ्या सौंदर्याच्या कल्पनेला मान्यता देऊ शकत नाही : अदिती राव हैदरी

2000च्या वाम्शी या तेलुगु हिट चित्रपटाच्या सेटवर नम्रता आणि महेश भेटले. या जोडप्याने 2005मध्ये लग्नगाठ बांधली होती आणि 2006मध्ये त्यांनी पहिला मुलगा गौतमचे स्वागत केले होते. कन्या सिताराचा जन्म 2012मध्ये झाला होता. यापूर्वी नम्रताने तिची मुलगी सितारा बेडवर उडी मारत असतानाचा थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details