मुंबई- बहुप्रतीक्षित झुंड हा चित्रपट ( Jhund will finally be released ) अखेर ४ मार्च २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. आज त्यांनी आपल्या ट्विटरवरुन ही घोषणा केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे ( Nagraj Manjule film Jhund ) यांनी केले आहे. मंजुळे यांनीही आपल्या पेसबुकवरुन ही माहिती पोस्ट केली आहे.
अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय," इस टोली से मुकाबला करने के लिए रहो तैयार. हमारी टीम आ रही है. झुंड चित्रपट ४ मार्च रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात."
झुंड चित्रपटाची कथा स्लम फुटबॉल लिगची ( Jhund movie based on Slum Football League ) आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना फुटबॉलचे धडे शिकवत त्यांना व्यसनापासून बाजूला नेणाऱ्या एका कतृत्ववान कोचची आहे. विजय बारसे यांच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेली ही कथा आहे. ही मध्यवर्ती भूमिका अमिताभ बच्चन साकारत आहेत.