महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नागराज मंजुळे आणि अमिताभ यांचा 'झुंड' १८ जुनला होणार रिलीज - Jhund poster

अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बॉलिवूड पदार्पणाचा झुंड हा चित्रपट आता १८ जुनला रिलीज होणार आहे. बिग बी यांनी ट्विट करुन ही घोषणा केली आहे.

Jhund poster
झुंड पोस्टर

By

Published : Feb 20, 2021, 3:36 PM IST

मुंबई- बहुप्रतीक्षित झुंड हा चित्रपट अखेर १८ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची पुष्टी अमिताभ बच्चन यांनी शुक्रवारी दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शन सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले आहे.

"कोविडने आम्हाला धक्का दिला .. पण आता पुनरागमन करण्याची वेळ आली आहे! आम्ही थियेटरमध्ये परत येत आहोत .. झुंड 18 जूनला रिलीज करीत आहे !!" असे बिग बी यांनी ट्विट केले आहे.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनीही ट्विट करुन अमिताभ आणि नागराज मंजुळेंचा झुंड हा चित्रपट १८ जूनला रिलीज होणार असल्याचे ट्विट करुन कळवले आहे.

झुंड चित्रपटाची कथा स्लम फुटबॉल लिगची आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना फुटबॉलचे धडे शिकवत त्यांना व्यसनापासून बाजूला नेणाऱ्या एका कतृत्ववान कोचची आहे. विजय बारसे यांच्या खऱ्या आयउष्यावर बेतलेली ही कथा आहे. ही मध्यवर्ती भूमिका अमिताभ बच्चन साकारत आहेत.

या चित्रपटातील इतर कलाकार हे खरोखर झोपडपट्टीत राहणारे फुटबॉल खेळाडू आहेत. सैराट फेम आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरुचीदेखील यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

नागराज मंजुळे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहेत. अमिताभसोबत काम करण्याचे त्यांचे स्वप्न होते. झुंडच्या माध्यमातून ते आता पूर्ण होतंय. झुंडच्या टीझर आणि ट्रेलरची आता प्रेक्षकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

हेही वाचा - रणबीर कपूर, श्रद्धा कपूर आणि लव्ह रंजन यांनी पकडलाय २०२२ च्या होळीचा मुहूर्त !

ABOUT THE AUTHOR

...view details