मुंबई - चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांवरील त्यांचा महत्त्वाकांक्षी बहुभाषिक त्रयी चित्रपटाचे काम कोरोना साथीच्या महामारीमुळे थांबले आहे. 2019 मध्ये नागराज आणि रितेश देशमुख यांनी या विषावरील तीन चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली होती. शिवरायांचा इतिहास उलगडणारी ही 'शिवत्रयी' दिग्दर्शक नागराज मुंजुळे, प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या संकल्पनेतून रूपेरी पडद्यावर अवतरणार होती.
या चित्रपटाची निर्मिती रितेश देशमुखच्या मुंबई फिल्म कंपनी या बॅनरखाली करण्यात येणार होता. २०२१ मध्ये पहिला भाग रिलीज करण्याची तयारी त्यांनी केली होती. मात्र कोरोना साथीमुळे प्रोजेक्टला विलंब झाला आहे.
"साथीच्या रोगामुळे आमचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यामुळे आम्हाला दोन वर्षे वाया गेली, त्यामुळे साहजिकच आम्ही तो फ्लोवरवर शूटसाठी जाऊ शकलो नाही. पण असे नाही की चित्रपट रखडला आहे. हा एक प्रोजेक्ट आहे ज्याबद्दल मी खूप उत्कट आहे आणि एकदा सर्वकाही सुरळीत पार पडले की मी तुम्हाला सांगेन'', असे नागराज मुंजुळे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.
"फँड्री", "सैराट" सारख्या मराठी चित्रपटांनंतर आणि अलीकडेच प्रदर्शित झालेल्या "झुंड" या हिंदी चित्रपटानंतर चित्रपट निर्मात्याची सर्वात मोठी निर्मिती म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांवरील आगामी ऐतिहासिक प्रोजेक्टकडे पाहिले जात आहे.