हल्ली बऱ्याच मराठी-हिंदी मालिकांत बालकलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधील प्रेक्षकांची लाडकी परी म्हणजेच मायरा वायकुळ. या मालिकेतील सीन वाचता न येणारी परी शूटची तयारी कशी करते हे जाणून घेण्याबाबत प्रेक्षकांना खूपच उत्सुकता आहे. मायराने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओतून ती कशी तयारी करते हे दिसत आहे.
मालिकेत दिग्गज कलाकारांची फौज असताना मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे ती चिमुरडी बाल कलाकार मायरा वायकुळ. मायरा हीने या मालिकेत परीची भूमिका साकारली आहे. मायरा सोशल मीडियावर देखील खूप ऍक्टिव्ह आहे. ती सतत तिचे फोटोज आणि व्हिडीओज चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला ज्यात ती अभिनयाची प्रॅक्टीस करताना दिसत आहे, तर याबाबतच अनेकांनी तिला प्रश्न विचारले होते, तर मायरा हिला ज्या वेळेस शूट करायचा असतो, त्यावेळेस ती अनेकांची मदत घेते.
सुरुवातीला मालिकेचे दिग्दर्शक मायरा हिला तीचा सीन काय आहे, ते समजून सांगतात. त्यानंतर तिला प्रार्थना आणि श्रेयस हे देखील तिचा सीन समजावून सांगण्यास मदत करतात. त्यानंतर ती आपल्याला काय डायलॉग म्हणायचे आहेत, ते आत्मसात करते. त्यानंतर ती अतिशय व्यवस्थितरित्या डायलॉग डिलिव्हरी करते.