मुंबई- 'बजरंगी भाईजान' या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारी हर्षाली मल्होत्रा सोशल मीडियावर लोकप्रिय ठरत आहे. इन्स्टाग्रामवर तिला फॉलो करणाऱ्या लोकांची संख्या लाखोत आहे. चाहते हर्षाली मल्होत्राच्या नवीन पोस्टची आतुरतेने वाट पाहात असतात. नुकताच हर्षाली मल्होत्राने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हर्षाली तिच्या चाहत्यांना खूप मजेदार प्रश्न विचारत आहे.
या व्हिडिओमध्ये हर्षाली मल्होत्राची स्टाईल कौतुकास्पद आहे. तिच्या क्यूटनेसमुळे ती चाहत्यांना खूप आवडली आहे. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती म्हणतेय की, "मैं बस एक ही शर्त पर हां करूंगी कि गुस्सा भी मैं करूंगी, बात भी मैं नहीं करूंगी, रूठूंगी भी मैं, लेकिन मनाओगे आप.'