मुंबई- सलमान खानच्या सुपरहिट 'बजरंगी भाईजान' चित्रपटामध्ये छोट्या 'मुन्नी'ची भूमिका साकारणारी हर्षाली मल्होत्रा सध्या चर्चेत आहे. चित्रपटात तिच्या व्यक्तिरेखेला चांगली पसंती मिळाली होती. सध्या हर्षाली मल्होत्राचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या तुलनेत आता तिचा लूक पूर्णपणे बदलला असल्याचे फोटोंमधून दिसून येत आहे.
हेही वाचा -मी पुन्हा येईन, पुन्हा गाईन : अमृता फडणवीसांचा नवा निर्धार
फोटोत हर्षाली मल्होत्राला ओळखणे अवघड आहे. 'बजरंगी भाईजान' चित्रपट २०१५मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटादरम्यान हर्षाली मल्होत्रा अवघ्या 7 वर्षांची होती आणि आता ती 12 वर्षांची झाली आहे. दिवाळी आणि भाऊबीज सारख्या सणांच्या निमित्ताने हर्षालीने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हेही वाचा -१ अब्ज व्यूव्ह्ज : धनुषच्या 'कोलावरी डी'चा मोडला त्याच्याच 'राउडी बेबी'ने विक्रम
हर्षाली मल्होत्राला इन्स्टाग्रामवर ४ लाख फॉलोअर्स आहेत. 'बजरंगी भाईजान' चित्रपटानंतर इन्स्टाग्रामवर लोकप्रिय बनली. तिच्या फोटोंना चाहत्यांनी पसंती दर्शवली असून भरपूर कॉमेंट्सही तिला मिळत आहेत.