मुंबई - पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठच्या (actress Gehana Vasisth) अचडणीत वाढ होताना दिसत आहे. त्यात तिला दिलासाही मिळताना दिसत नाही. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा (RAJ KUNDRA) अटकेत आहे. पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये आता गहना वशिष्ठलाही मुंबई सेशन कोर्टाने जोरदार झटका दिला आहे. गहना वशिष्ठची अटकपूर्व जामीन याचिका सेशन कोर्टाने फेटाळून लावली आहे. मालवणी पोलीस स्टेशनमध्ये गहना वशिष्ठच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर तिनं जामिनासाठी याचिका दाखल केली होती.
नवीन कलाकारांची फसवणूक
टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल गहना वशिष्ठला मुंबई क्राइम ब्रँचने (Mumbai Crime Branch) अटक केली होती. सध्या ती जामीनावर बाहेर आहे. ती टीव्ही, चित्रपट या क्षेत्रामध्ये पदार्पण करू इच्छिणाऱ्या आणि यामध्ये करीअर करण्यासाठी धडपड करणाऱ्यांना काम देण्याचे आमिष दाखवून त्यांना अश्लील व्हिडिओ निर्मितीसाठी काम करण्यास भाग पाडत होती. त्यानंतर ते व्हिडिओ विविध वेबसाईटवर प्रदर्शित करत लाखो रुपये कमवत असल्याचा तिच्यावर आरोप आहे.
न्यायालयाचा दणका
याच प्रकरणात आता अटक टाळण्यासाठी तिने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज आता मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, गहना वशिष्ठ विरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.