महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नवाज-आथियाचा 'मोतीचूर चकनाचूर' वादाच्या भोवऱ्यात, ट्रेलर रिलीजला कोर्टाने केली मनाई - Navajuddin Siddiqui latest news

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आथिया शेट्टी यांचा 'मोतीचूर चकनाचूर' हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला स्थगितीचा आदेश दिला आहे.

मोतीचूर चकनाचूर

By

Published : Oct 10, 2019, 11:23 PM IST

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने 'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजला स्थगिती दिली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आथिया शेट्टी यांची भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर १० ऑक्टोबरला रिलीज होणार होता.

'मोतीचूर चकनाचूर' या चित्रपटाचे लेखक देव मित्र बिस्वाल यांचे मानधन दिले नसल्यामुळे त्यांनी निर्माता उडपेकर मुव्हीज प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने ट्रेलरला स्थगिती देण्याच निर्णय दिला आहे.

बिस्वाल यांना ११ लाख रुपये मानधन देण्याचे निर्मात्याने ठरले होते. मात्र केवळ ६ लाख रुपयेच त्यांना मिळाले. गेली पाच वर्षे बिस्वास या स्क्रिप्टवर काम करीत होते. निर्मात्यांना कथानक आवडले व तिन चित्रपटांसाठी करारबध्द केले. यातील 'मोतीचूर चकनाचूर' हा पहिलाच चित्रपट होता. मात्र एडिंटिंगच्या दरम्यान कंपनीचे संचालक राजेश भाटिया आणि बिस्वाल यांच्यात मतभेद झाले होते.

कंपनीच्यावतीने बिस्वाल यांना एक ईमेल पाठवण्यात आला. यात त्यांची सेवा संपली असल्याचे लिहिण्यात आले होते. त्यानंतर बिस्वाल यांनी निर्मात्याशी संपर्क केला. परंतु त्यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायलयाचे दार ठोठावले होते.

सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून ती पूर्ण होईपर्यंत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details