मुंबई - देशभरात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे नागरिकांचे मनोरंजन व्हावे, या उद्दशाने टीव्हीवर पुन्हा एकदा 'रामायण' आणि 'महाभारत' या पौराणिक मालिका प्रसारित करण्यात आल्या आहेत. सध्या इतर कोणते कार्यक्रम सुरू नसल्यामुळे या मालिकांना चांगला प्रेक्षकवर्ग मिळत आहे. 'महाभारत' या मालिकेत 'भीष्म पितामह' यांची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांनी याबाबत अलीकडेच माध्यमांशी संवाद साधला.
ज्यांना यापूर्वी ही मालिका पाहता आली नाही त्यांना आता ही मालिका पाहण्याची संधी आहे. अनेकांसाठी ही मालिका फायदेशीर ठरेल. त्यांच्या ज्ञानात यामुळे भर पडेल. सोनाक्षी सारख्या अभिनेत्रींना देखील रामायण, महाभारताविषयी आणखी माहिती मिळेल, असे म्हणत त्यांनी सोनाक्षी सिन्हाला टोला लगावला.
त्याचं झालं असं होतं की, 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात सोनाक्षीने सहभाग घेतला होता. यामध्ये तिला रामायणातील एक सोपा प्रश्न विचारण्यात आला होता. हनुमान संजीवनी बुटी कोणासाठी घेऊन जात असतात या प्रश्नाचे उत्तर तिला सांगता आले नव्हते. या प्रश्नाचे उत्तर लक्ष्मण असे होते. तिला यासाठी 'एक्स्पर्ट सल्ला' हा पर्याय निवडावा लागला होता.
या भागानंतर सोनाक्षी सोशल मीडियावर बरीच ट्रोल झाली होती.
'अशा' लोकांसाठीच 'रामायण', 'महाभारत' मालिकेचे पुन्हा प्रसारण आवश्यक, मुकेश खन्ना यांचा सोनाक्षीला टोला - mukesh khanna latest news
टीव्ही वर पुन्हा एकदा 'रामायण' आणि 'महाभारत' या पौराणिक मालिका प्रसारित करण्यात आल्या आहेत. सध्या इतर कोणते कार्यक्रम सुरू नसल्यामुळे या मालिकांना चांगला प्रेक्षकवर्ग मिळत आहे.
'अशा' लोकांसाठीच 'रामायण', 'महाभारत' मालिकेचे पुन्हा प्रसारण आवश्यक, मुकेश खन्ना यांचा सोनाक्षीला टोला
मुकेश खन्ना यांनी एका मीडियामुलाखती दरम्यान महाभारताविषयी बऱ्याच गोष्टी शेअर केल्या. त्यांची मुख्य भूमिका असलेला 'शक्तिमान' हा कार्यक्रम देखील पुन्हा प्रसारित झाला आहे. त्यामुळे शक्तिमानच्या चाहत्यांना पुन्हा एकदा टीव्हीवर शक्तिमान पाहण्याची संधी मिळाली आहे
.महाभारत, 'रामायण' यांच्या सोबतच दूरदर्शनवर 'सर्कस', 'ब्योमकेश बख्शी', 'शक्तिमान', 'चाणक्य' यासारख्या मालिकादेखील पुन्हा प्रसारित होणार आहेत.
Last Updated : Apr 5, 2020, 1:22 PM IST