मुंबई- 'भूत पोलिस' या भयपट चित्रपटाच्या निर्मात्यांनी डलहौसीमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. आज या चित्रपटाचा मुहूर्त होता त्यानिमित्ताने अर्जुन आणि करिनाने चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे.
अभिनेता अर्जुन कपूरने चित्रपटाचा अधिकृत लोगो आणि शूटिंग सेटवरील क्लॅपबोर्डचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
करिना कपूर खानने चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना लिहिले, "न्यू नॉर्मल इज पॅरानॉर्मल." याबरोबरच तिने चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.
पवन कृपलानी दिग्दर्शित या चित्रपटात सैफ अली खान, अर्जुन कपूर, यामी गौतम, जावेद जाफरी आणि जॅकलिन फर्नांडिस हे मुख्य कलाकार आहेत. या चित्रपटाचे निर्माते रमेश तरानी आणि अक्षय पुरी आहेत.
दिग्दर्शक पवन कृपलानी यापूर्वी 'फोबिया' आणि 'रागिनी एमएमएस'सारखे चित्रपट बनवले आहेत. या कलाकारांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जॅकलिन फर्नांडिस 'अॅटॅक' आणि 'किक 2' चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्री यामी गौतम अलीकडेच 'गिन्नी वेड्स सनी' या चित्रपटात दिसली होती.
'भूत पोलिस' चित्रपटाशिवाय सैफ अली खानदेखील 'आदिपुरुष' चित्रपटात दिसणार आहे. त्याच वेळी अभिनेता अर्जुन कपूर 'संदीप और पिंकी फरार' या चित्रपटात दिसणार आहे, त्याशिवाय अर्जुन कपूर 'क्रॉस बॉर्डर लव्ह स्टोरी'मध्ये दिसणार आहे.