महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

खासदार किरण खेर यांना रक्ताचा कॅन्सर, अनुपम खेर यांनी दिला बातमीला दुजोरा - अनुपम खेर यांनी दिला बातमीला दुजोरा

भाजपच्या खासदार आणि प्रसिध्द बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर यांना रक्ताच्या कॅन्सरचे निदान झाले आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार घेत आहेत. याबातमीला त्यांचे पती अनुपम खेर आणि मुलगा सिकंदर यांनी दुजोरा दिला आहे.

MP Kiran Kher
खासदार किरण खेर

By

Published : Apr 1, 2021, 3:29 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या चंदीगडच्या खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. ही बातमी कळताच बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे. दिग्गज अभिनेता अनुपम खेर यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे.

अनुपम खेर यांचे निवेदन

किरण खेर यांना मल्टीपल मायलोमाचे निदान झाले आहे. हा एक प्रकारचा रक्ताचा क्षयरोग आहे. सध्या किरण यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. त्या लढाऊ असल्यामुळे या आजाराचा मुकाबला करतील. त्यांच्यासाठी प्रार्थना करीत रहा असे एका निवेदनात अनुपम खेर आणि त्यांचा मुलगा सिकंदर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details