महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बोले चूडिया'मधून मौनी रॉयचा पत्ता कट? बेजबाबदारपणामुळे निर्मात्यांनी घेतला निर्णय - upcoming movie

काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील मौनीचा लूकही समोर आला होता. अशात आता या चित्रपटातून मौनीचा पत्ता कट झाला असल्याचे वृत्त समोर आलं आहे. मौनीच्या बेजबाबदारपणामुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.

'बोले चूडिया'मधून मौनी रॉयचा पत्ता कट

By

Published : Jun 1, 2019, 3:45 PM IST

मुंबई- टीव्ही अभिनेत्री मौनी रॉयने गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं चांगलच कौतुक झालं. यानंतर लगेचच मौनीला आणखी एका चित्रपटाची ऑफर आली. बोले चूडिया असं या चित्रपटाचं शीर्षक असून यात ती नवाजुद्दीनसोबत स्क्रीन शेअर करणार होती.

काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील मौनीचा लूकही समोर आला होता. अशात आता या चित्रपटातून मौनीचा पत्ता कट झाला असल्याचे वृत्त समोर आलं आहे. मौनीच्या बेजबाबदारपणामुळे निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाच्या स्क्रीप्ट रिडींगमध्ये तिने आतापर्यंत केवळ एकदाच सहभाग घेतला आणि यावेळीही ती ३ तास उशिरा पोहोचली. आतापर्यंत इतर चित्रपटांत तिने साकारलेले रोल खूप लहान होते. मात्र, या चित्रपटात अभिनेत्रीला अधिक महत्व आहे. चित्रपटातील तीन गाणी अभिनेत्रीवर चित्रित केली जाणार आहेत. अशात तिचं हे वागणं चित्रपटासाठी ठीक नसल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे.

चित्रपटाचं शूटींग ठरवलेल्या शेड्यूलप्रमाणेच पूर्ण व्हावं यासाठी आम्ही तिला रिप्लेस करण्याचा निर्णय घेतला असल्याचं निर्मात्यांनी म्हटलं आहे. तिच्या या वागण्याबद्दल चित्रपटातील अभिनेता, निर्माते आणि दिग्दर्शकाने तिला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र याचा काहीही फायदा झाला नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. आता निर्मात्यांच्या या निर्णयानंतर मौनीच्या जागी कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details