चेन्नई- दिग्दर्शक अन्बूच्या आगामी 'रेकला' या तमिळ अॅक्शन चित्रपटात अभिनेता प्रभूदेवा प्रमुख भूमिकेत असणार आहे. अभिनेता आर्यने आपल्या ट्विटरवर रेकला या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे. त्याने या पोस्टमध्ये लिहिलंय, "हे आहे प्रभू देवाच्या 58व्या चित्रपट रेकलाचे रोमांचक शीर्षक-रूप मोशन पोस्टर!"
अन्बू दिग्दर्शित आणि ऑलिंपिया मुव्हीजचे एस अम्बेथ कुमार निर्मित, या चित्रपटाला घिब्रान यांचे संगीत आहे. चित्रपट युनिटच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की कलाकार आणि इतर क्रू मेंबर्स फायनल केले जात आहेत.