मुंबई- स्त्री आणि जजमेंटल हैं क्या या चित्रपटांतून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलेला अभिनेता राजकुमार राव लवकरच मेड इन चायना सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात त्याच्या अपोझिट गोल्ड सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मौनी रॉय झळकणार आहे.
इंडिया का जुगाड, राजकुमार रावच्या 'मेड इन चायना'चं मोशन पोस्टर प्रदर्शित - जजमेंटल हैं क्या
मिखील मुसळेद्वारा दिग्दर्शित या सिनेमाचं मोशन पोस्टर आता प्रदर्शित करण्यात आलं आहे. चित्रपटाचा ट्रेलर एका आठवड्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर हा सिनेमा दिवाळीत म्हणजेच येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मिखील मुसळेद्वारा दिग्दर्शित या सिनेमाचं मोशन पोस्टर आता प्रदर्शित करण्यात आलं आहे. चित्रपटाचा ट्रेलर एका आठवड्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर हा सिनेमा दिवाळीत म्हणजेच येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इंडिया का जुगाड, असं या मोशन पोस्टरवर लिहिलं आहे.
दिनेश विजन यांनी मेड इन चायनाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात राजकुमार आणि मौनी यांच्याशिवाय बोमन इराणी, गजराज राव, सुमित व्यास, अमायरा दस्तुर आणि परेश रावल यांच्याही महत्तवाच्या भूमिका आहेत.