मुंबई- दबंग आणि दबंग २ या सिनेमांना मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच दबंग ३ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्यापासून भाईजान अनेकदा सेटवरील फोटो आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत होता. यानंतर आता सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
चुलबूल पांडे येतोय, दबंग ३चं मोशन पोस्टर प्रदर्शित - प्रभूदेवा
सलमान खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हिंदी, तमिळ, कन्नड आणि तेलुगूमधील चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. १०० दिवसात येतोय, स्वागत तर करा, असं कॅप्शन सलमानने या पोस्टला दिलं आहे.
सलमान खानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हिंदी, तमिळ, कन्नड आणि तेलुगूमधील चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर केलं आहे. '१०० दिवसात येतोय, स्वागत तर करा', असं कॅप्शन सलमानने या पोस्टला दिलं आहे. याशिवाय दबंग ३ चं फर्स्ट लूक पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. ज्यात भाईजानचा नेहमीप्रमाणेच डँशिंग अंदाज पाहायला मिळत आहे.
या सिनेमाचं दिग्दर्शन नृत्य दिग्दर्शक प्रभूदेवा यांनी केलं आहे. प्रभूदेवाने याआधी सलमानच्या वॉन्टेड सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या मुख्य भूमिका असलेला दबंग ३ चित्रपट २० डिसेंबरला हिंदीसह तेलुगू, तमिळ आणि कन्नड या दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित होत आहे.