महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘एक व्हिलन रिटर्न्स’चे शुटिंग सुरू, याच दिवसाची प्रतीक्षा करीत होता मोहित सूरी!! - ‘एक व्हिलन’ चा सिक्वेल

"मी ‘एक व्हिलन रिटर्न्स' च्या शुटिंगला सुरुवात करण्यास खूप उत्सुक आहे. मी या दिवसाची वाट पाहत होतो. दुर्दैवाने, सर्वत्र कोरोना साथीच्या रोगाचा प्रसार झाला आणि आम्हाला या चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलावे लागले होते. पण आता मला आनंद आहे, असे दिग्दर्शक मोहित सूरी म्हणाला. ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात केल्यानंतर मोहितने हे उद्गार काढले.

Ek Villain Returns'
‘एक व्हिलन रिटर्न्स’चे शुटिंग सुरू

By

Published : Mar 2, 2021, 11:54 AM IST

मुंबई - ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटाच्या शुटिंगला मुंबईत सुरुवात झाली आहे. दिग्दर्शक मोहित सूरी यामुळे उत्साही बनले आहेत. याबद्दल बोलताना दिग्दर्शक मोहित सूरी म्हणाला, "मी ‘एक व्हिलन रिटर्न्स' च्या शुटिंगला सुरुवात करण्यास खूप उत्सुक आहे. मी या दिवसाची वाट पाहत होतो. दुर्दैवाने, सर्वत्र कोरोना साथीच्या रोगाचा प्रसार झाला आणि आम्हाला या चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलावे लागले होते. पण आता मला आनंद आहे की आम्ही आमच्या आवडत्या ठिकाणी, म्हणजेच फिल्म शूटच्या जागी, परतलो आहोत. मला आशा आहे की ‘एक व्हिलन रिटर्न्स' त्याच्या प्रिक्वेलप्रमाणेच सुपरहिट ठरेल.’

‘एक व्हिलन रिटर्न्स’चे शुटिंग सुरू

निरागस चेहरा आणि हॉट बॉडी यांचं अनोखं कॉम्बिनेशन असणारी दिशा पाटनी आणि हँडसम दिसणारा व हॉट बॉडी असणारा जॉन अब्राहम यांची पहिल्यांदाच जोडी जमलीय ‘एक व्हिलन रिटर्न्स’ मध्ये. हे दोघेही स्टार्स पडद्यावर आग लावताना दिसतील तसेच त्यांच्यातील हॉट केमिस्ट्री चित्रपटगृहातील गर्मी वाढविणारी असेल असे दिग्दर्शकाचे मत आहे. २०१४ साली आलेल्या व बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या ‘एक व्हिलन’ चा हा सिक्वेल असून आतापासूनच याची चर्चा सुरु झाली आहे, जॉन-दिशा कॉम्बिनेशनमुळे. त्यातच दिग्दर्शक, दोन्ही ‘व्हिलन’ चा, मोहित सूरी पडद्यावर रोमान्स इंटरेस्टिंग पद्धतीने दर्शविण्यासाठी प्रसिद्ध आहे. ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चे शूट सुरु झाले असून पहिल्या दिवशी चित्रपटातील प्रमुख कलाकारांनी यात भाग घेतला.

‘एक व्हिलन रिटर्न्स’चे शुटिंग सुरू
‘जी ७’ मल्टिप्लेक्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे येथील चित्रपटगृहात याचे चित्रीकरण सुरु झाले. पहिला शॉट दिशा पाटनी आणि जॉन अब्राहम यांच्यावर चित्रीत झाला व मोहित सूरीने ‘कट’ म्हटल्यावर उपस्थितांनी जल्लोष केला. खरंतर हे चित्रपटगृह संकुल असले तरी सिंगल स्क्रीन चा प्रेक्षकवर्ग येथे गर्दी करतो व चित्रपट प्रदर्शित झाल्यावर इथे गर्दी झाली वा हाऊसफुल चा बोर्ड झळकला तर चित्रपट यशस्वी झाला असे मानण्यात येते. बरेच स्टार्स (काही बुरखा घालून) येथे प्रेक्षकांसोबत चित्रपट बघतात, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी. तर अशा या प्रतिमानिष्ठ वास्तूत ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चे चित्रीकरण सुरु झाल्यामुळे तो हिट ठरणार अशी अटकळ निर्माते बांधताहेत. चित्रपटाच्या मुहूर्त शॉटसाठी निर्माती एकता कपूर आणि ‘टी-सिरीज’ चे भूषण कुमारदेखील आवर्जून उपस्थित होते. या चित्रपटाची निर्माती एकता कपूर म्हणाली, "’व्हिलन’ फ्रँचायझी पुढे नेण्यासाठी मी उत्सुक व उत्साही आहे आणि प्रेक्षकांना दुसर्‍यांदा नाट्यमय अनुभव देण्यास उतावीळ आहे. यावेळी ॲक्शन, नाट्य आणि सस्पेन्स यात चढती भाजणी असेल याची ग्वाही मी आताच देते. लवकरच भेटू चित्रपटगृहांमध्ये.’ निर्माते भूषणकुमार यांनी आपला उत्साह व्यक्त करताना म्हणाले की, “‘एक व्हिलन रिटर्न्स’ फ्लोअरवर जाताना पाहून खरोखर खूपच जबरदस्त वाटतंय आणि बऱ्याच भावना दाटून आल्या आहेत. आमच्याकडे कलाकार आणि क्रू ची अप्रतिम टीम आहे आणि प्रेक्षकांना मनोरंजनाचा थरारक अनुभव देण्याचे आमचे लक्ष्य आहे.”निर्माते एकता कपूर आणि भूषण कुमार यांच्या ‘एक व्हिलन रिटर्न्स’ चे दिग्दर्शन मोहित सूरी यांनी केले असून टी-सीरिज आणि बालाजी टेलिफिल्म्स या बॅनर्सनी संयुक्तपणे निर्मिती केली आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट ११ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे.हेही वाचा - "ऑल द बेस्ट व्हिलन" म्हणत टायगरने दिशा पाटनीला पाठवला संदेश

ABOUT THE AUTHOR

...view details