मुंबई- चित्रपट निर्माते मोहित सूरीने पुढच्या वर्षी ११ फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटासह प्रेक्षकांना 'थ्रिलिंग रोलरकोस्टर राइड'चे आश्वासन दिले आहे.
"एक व्हिलन हा माझा पॅशन चित्रपट आहे. एक व्हिलन चित्रपटामुळे मिळालेल्या प्रेमामुळे मी आजही भारावलेला आहे.'एक व्हिलन रिटर्न्स'मुळे हे प्रेम आणखी वाढणार आहे. या चित्रपटाबद्दल जास्त काही मी आता उलगडून सांगू शकत नाही, पण हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना 'थ्रिलिंग रोलरकोस्टर राइड' असेल हे खात्रीपूर्वक सांगू शकतो.'', असे मोहित सुरी म्हणाला.