मोहित चौहानने कोरोना योध्यांना गाण्यातून केले अभिवादन, पाहा व्हिडिओ - mohit chouhan salam song
या व्हिडिओत कोरोनाशी लढण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे डॉक्टर्स, नर्स, पोलीस यांचे दृश्य वापरण्यात आले आहेत. या सर्वांचे आभार मानत त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

मोहित चौहानने कोरोना योध्यांना गाण्यातून केले अभिवादन, पाहा व्हिडिओ
मुंबई - बॉलीवूड गायक मोहित चौहानने शुक्रवारी आपले नवे गाणे प्रदर्शित केले. या गाण्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करणाऱ्या योध्यांना अभिवादन करण्यात आले आहे. सलाम असे या गाण्याचे बोल आहेत.
मोहित यांनी या गाण्यातून कोरोना योध्यांचे आभार मानले आहेत. या व्हिडिओत कोरोनाशी लढण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे डॉक्टर्स, नर्स, पोलीस यांचे दृश्य वापरण्यात आले आहेत. या सर्वांचे आभार मानत त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.